उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार
उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार दोन किंवा अधिक शब्द, अथवा दोन किंवा अधिक वाक्ये जोडणार्या अविकारी शब्दाला अभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. मी कथा व कादंबरी वाचतो. तो स्वभावाने आहे चांगला, पण विश्वासू नाही. मी आजारी आहे, म्हणून मी शाळेत जात नाही. मी चहा घेतो आणि कॉफी सुद्धा घेतो. उभायान्वयी अव्ययाचे 2 प्रकार पडतात. समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये. असमानत्वदर्शक / गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये : अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र किंवा एकमेकांवर अवलंबून नसणारी किंवा सारख्याच दर्जाची दोन वाक्ये ज्या उभयान्वयी अव्ययांनी जोडली जाते त्या उभयान्वयी अव्ययांना प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. यांचे पुढील 4 प्रकार पडतात. 1. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय – दोन प्रधान किंवा मुख्य वाक्ये व, अन्, शिवाय यांसारख्या उभयान्वयी अव्ययांनी जोडून त्याचा मिलाफ किंवा समुच्चय करतात अशा उभयान्वयी अव्ययांना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. व, अन्, आणि आणखी, न, शि...