पोस्ट्स

ऑगस्ट, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शब्दसिद्धी व त्याचे प्रकार

शब्दसिद्धी व त्याचे प्रकार मराठी भाषेत वापरण्यात येत असलेली सर्वच शब्द मूळ मराठी भाषेमधील नाहीत. मराठी भाषेत संस्कृत (तत्सम), पाकृत (तत्भव) इत्यादी भाषेतील शब्दांचा मोठ्या प्रमाणात समावेश आढळतो. नंतरच्या काळात मराठी भाषेचा संबंध अरबी, फारसी, हिंदी, कन्नड, पोर्तुगाल, इंग्रज अशा अनेक लोकांशी आला. त्यामुळे त्या भाषेतील शब्दांचा सुद्धा मराठी भाषेत प्रवेश झाला. मराठी भाषेतील काही शब्द इतर भाषेच्या अपभ्रंशामधून आलेली आहेत. आज आपल्या भाषेत जो शब्दसंग्रह आहे. त्यावरून शब्दाचे खालील प्रकार पडतात. शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच  ‘शब्दसिद्धी’   असे म्हणतात. शब्दांचे खालील प्रकार पडतात.  तत्सम शब्द : जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बादल न होता आले आहेत त्यांना ‘तत्सम शब्द’ असे म्हणतात. उदा. राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवि, वायु, भीती, पुत्र, अधापि, मति, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, ...

काळ व त्याचे प्रकार

काळ व त्याचे प्रकार वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला ‘काळ’ असे म्हणतात. काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात. वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ  1) वर्तमानकाळ : क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ   ‘वर्तमानकाळ’   असतो. उदा. मी आंबा खातो. मी क्रिकेट खेळतो. ती गाणे गाते. आम्ही अभ्यास करतो. वर्तमानकाळाचे 4 उपप्रकार घडतात. i) साधा वर्तमान काळ जेंव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ  साधा वर्तमानकाळ असतो. उदा.  मी आंबा खातो. कृष्णा क्रिकेट खेळतो. प्रिया चहा पिते. ii) अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमानकाळ जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन क्रिया वर्तमानामध्ये चालू किंवा सुरू असल्याचा बोध होतो. तेव्हा वाक्याचा काळ  अपूर्ण वर्तमान  असतो. उदा.  सुरेश पत्र लिहीत आहे. दिपा अभ्यास करीत आहे. आम्ही जेवण करीत आहोत. iii) पूर्ण वर्तमान काळ जेव्हा क्रिया ही वर्तमा...