काळ व त्याचे प्रकार
काळ व त्याचे प्रकार
वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला ‘काळ’ असे म्हणतात.
काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात.
1) वर्तमानकाळ :
क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ ‘वर्तमानकाळ’ असतो.
उदा.
वर्तमानकाळाचे 4 उपप्रकार घडतात.
i) साधा वर्तमान काळ
जेंव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा वर्तमानकाळअसतो.
उदा.
ii) अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमानकाळ
जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन क्रिया वर्तमानामध्ये चालू किंवा सुरू असल्याचा बोध होतो. तेव्हा वाक्याचा काळ अपूर्ण वर्तमान असतो.
उदा.
iii) पूर्ण वर्तमान काळ
जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला ‘पूर्ण वर्तमानकाळ’ असे म्हणतात.
उदा.
iv) रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ
वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला ‘रीती वर्तमानकाळ’ असे म्हणतात.
उदा.
2) भूतकाळ :
जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. असा बोध होतो तेव्हा त्या काळाला ‘भूतकाळ’ असे म्हणतात.
उदा.
भूतकाळचे 4 उपप्रकार पडतात.
i) साधा भूतकाळ
एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास ‘साधा भूतकाळ’ असे म्हणतात.
उदा.
ii) अपूर्ण/चालू भूतकाळ
एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला ‘अपूर्ण भूतकाळ/चालू भूतकाळ’ असे म्हणतात.
उदा.
iii) पूर्ण भूतकाळ
एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पुर्णपणे संपलेली असते, असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला ‘पूर्ण भूतकाळ’ असे म्हणतात.
उदा.
iv) रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ
भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते. अशा काळाला ‘चालू-पूर्ण भूतकाळ’ किंवा ‘रीती भूतकाळ’ असे म्हणतात.
उदा.
3) भविष्यकाळ :
क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला ‘भविष्यकाळ’असे म्हणतात.
उदा.
i) साधा भविष्यकाळ
जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी ‘साधा भविष्यकाळ’ असतो.
उदा.
ii) अपूर्ण / चालू भविष्यकाळ
जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला ‘अपूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.
उदा.
iii) पूर्ण भविष्यकाळ
जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला ‘पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.
उदा.
iv) रीती भविष्यकाळ / चालू पूर्ण भविष्यकाळ
जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल, तर त्याला ‘रीती/ चालू पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.
उदा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा