पोस्ट्स

शब्दसिद्धी व त्याचे प्रकार

शब्दसिद्धी व त्याचे प्रकार मराठी भाषेत वापरण्यात येत असलेली सर्वच शब्द मूळ मराठी भाषेमधील नाहीत. मराठी भाषेत संस्कृत (तत्सम), पाकृत (तत्भव) इत्यादी भाषेतील शब्दांचा मोठ्या प्रमाणात समावेश आढळतो. नंतरच्या काळात मराठी भाषेचा संबंध अरबी, फारसी, हिंदी, कन्नड, पोर्तुगाल, इंग्रज अशा अनेक लोकांशी आला. त्यामुळे त्या भाषेतील शब्दांचा सुद्धा मराठी भाषेत प्रवेश झाला. मराठी भाषेतील काही शब्द इतर भाषेच्या अपभ्रंशामधून आलेली आहेत. आज आपल्या भाषेत जो शब्दसंग्रह आहे. त्यावरून शब्दाचे खालील प्रकार पडतात. शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच  ‘शब्दसिद्धी’   असे म्हणतात. शब्दांचे खालील प्रकार पडतात.  तत्सम शब्द : जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बादल न होता आले आहेत त्यांना ‘तत्सम शब्द’ असे म्हणतात. उदा. राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवि, वायु, भीती, पुत्र, अधापि, मति, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, ...

काळ व त्याचे प्रकार

काळ व त्याचे प्रकार वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला ‘काळ’ असे म्हणतात. काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात. वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ  1) वर्तमानकाळ : क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ   ‘वर्तमानकाळ’   असतो. उदा. मी आंबा खातो. मी क्रिकेट खेळतो. ती गाणे गाते. आम्ही अभ्यास करतो. वर्तमानकाळाचे 4 उपप्रकार घडतात. i) साधा वर्तमान काळ जेंव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ  साधा वर्तमानकाळ असतो. उदा.  मी आंबा खातो. कृष्णा क्रिकेट खेळतो. प्रिया चहा पिते. ii) अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमानकाळ जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन क्रिया वर्तमानामध्ये चालू किंवा सुरू असल्याचा बोध होतो. तेव्हा वाक्याचा काळ  अपूर्ण वर्तमान  असतो. उदा.  सुरेश पत्र लिहीत आहे. दिपा अभ्यास करीत आहे. आम्ही जेवण करीत आहोत. iii) पूर्ण वर्तमान काळ जेव्हा क्रिया ही वर्तमा...

उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार

उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार दोन किंवा अधिक शब्द, अथवा दोन किंवा अधिक वाक्ये जोडणार्‍या अविकारी शब्दाला  अभयान्वयी अव्यये  असे म्हणतात. उदा. मी कथा व कादंबरी वाचतो. तो स्वभावाने आहे चांगला, पण विश्वासू नाही. मी आजारी आहे, म्हणून मी शाळेत जात नाही. मी चहा घेतो आणि कॉफी सुद्धा घेतो. उभायान्वयी अव्ययाचे 2 प्रकार पडतात. समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये. असमानत्वदर्शक / गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये : अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र किंवा एकमेकांवर अवलंबून नसणारी किंवा सारख्याच दर्जाची दोन वाक्ये ज्या उभयान्वयी अव्ययांनी जोडली जाते त्या उभयान्वयी अव्ययांना  प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यये  असे म्हणतात. यांचे पुढील 4 प्रकार पडतात. 1. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय – दोन प्रधान किंवा मुख्य वाक्ये व, अन्, शिवाय यांसारख्या उभयान्वयी अव्ययांनी जोडून त्याचा मिलाफ किंवा समुच्चय करतात अशा उभयान्वयी अव्ययांना  समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यये  असे म्हणतात. उदा.   व, अन्, आणि आणखी, न, शि...

विरामचिन्हे व त्याचे प्रकार

विरामचिन्हे व त्याचे प्रकार विरामचिन्हे हा स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा भाग आहे .त्याचा सविस्तर अभ्यास आम्ही देत आहोत संभाषण करतांना/बोलतांना थांबतो म्हणजेच विराम घेतो आणि तो चिन्हांनी दर्शविला जातो त्या चिन्हांना विरामचिन्हे असे म्हणतात. विरामचिन्हे दर्शविणारा तक्ता : अ.क्र. चिन्हाचे नाव चिन्ह केव्हा वापरतात 1 पूर्णविराम . वाक्य पूर्ण झाल्यावर शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी अक्षरांपूढे उदा. माझे जेवण झाले. मा.क.(मोहनदास करमचंद) 2 अर्धविराम ; दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडताना उदा. विजय हुशार आहे; पण तो अभ्यास करत नाही. 3 स्वल्पविराम ‘ एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधन (हाक मारणे) दर्शवितांना. उदा. माझ्याकडे इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान या सर्व विषयांचे पुस्तके आहेत. राम, इकडे ये. 4 अपूर्णविराम (उपपुर्णविराम) , वाक्याच्या शेवटी तपशील घावयाचा असल्यास. उदा. पुढील क्रमांकाचे विधार्थी उत्तीर्ण झाले: 5,7,9,12,15,18 5 प्रश्नचिन्ह ? प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी. उदा. तुझे नाव काय? तू कोठून आलास?...

नाम व त्याचे प्रकार

नाम व त्याचे प्रकार प्रत्यक्षात असणार्‍या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला ‘नाम’ असे म्हणतात. उदा. टेबल, कागद, पेन, साखर, अप्सरा, गाडी, खोटेपणा, औदार्थ, देव, स्वर्ग, पुस्तक इ.  नामाचे प्रकार : नामाचे एकूण 3 मुख्य प्रकार पडतात. सामान्य नाम – एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला  ‘सामान्य नाम’  असे म्हणतात. उदा. मुलगा, मुलगी, घर, शाळा, पुस्तक, नदी, शहर, साखर, पाणी, दूध, सोने, कापड, सैन्य, वर्ग इ. सामान्य नाम  विशेषनाम पर्वत हिमालय, सहयाद्री, सातपुडा मुलगा स्वाधीन, हिमांशू, लक्ष्मण, कपिल, भैरव मुलगी मधुस्मिता, स्वागता, तारा, आशा, नलिनी शहर नगर, पुणे, दिल्ली, मुंबई, कोल्हापूर नदी गंगा, सिंधू, तापी, नर्मदा, गोदावरी टीप : (सामान्य नाम हे जातीवाच असते, काही विशिष्ट नामांचेच अनेकवचन होते. मराठीमध्ये पदार्थवाचक, समुहवाचक नाम हे सामान्य नामच समजले जाते.) विशेष नाम – ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा...