भारतीय प्रमाणवेळ
आंतरराष्ट्रीय व भारताची प्रमाणवेळ (भाग-1)
स्पर्धा परीक्षांमध्ये प्रमानवेळेची गणिते येतात. त्यामुळे आपल्याला पूर्ण गुण मिळावे यासाठी हे प्रकरण मी लिहीत आहे . प्रमानवेळ काढताना भूगोलाचे ज्ञान व गणिताचे ज्ञान हे दोन्हीही आवश्यक असतात.प्रमानवेळेची आवश्यक माहिती सोप्या भाषेत दिली आहे .ह्याचा फायदा सर्व वाचकांना होईल याची मला खात्री आहे . याच्या दुसऱ्या भागात उदाहरणासाहित महिती दिलेली आहे .*जगातील सर्व व्यवहार, दळणवळण आशा बाबींची वेळेनुसार मांडणी करण्यासाठी जागतिक स्तरावर एक प्रमाणवेळ किंवा प्रमाणरेषा तयार करण्यात आली असून तिला आपण आंतरराष्ट्रीय वाररेषा असे म्हणतो.
180° रेखावृत्तापासून पूर्वेकडे गेल्यास एक दिवस वाढतो व 180° रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे गेल्यास एक दिवस कमी होतो.
आंतरराष्ट्रीय वाररेषेचे स्थान 180° रेखावृत्त पॅसिफिक महासागरात आहे.
* पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषांना रेखावृत्त असे म्हणतात.
* रेखावृत्तांची एकूण संख्या 360 असून मूळ रेखावृत्त हे इंग्लंड मधील ग्रीनीच शहरातून जाते . हे आंतरराष्ट्रीय रेखावृत्त 0° मानतात. ग्रीनीच पासून पूर्वेकडे 180 व पश्चिमेकडे 180 रेखावृत्ते आहेत.
* दोन रेखावृत्तांमधील अंतर 111.32 km असून ते विषुववृत्तावर सर्वाधिक आहे . तर उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव या ठिकाणी ते एका बिंदुपाशी कमी होत होत शून्य होते.
* पृथ्वीच्या परिवलनदरम्यान प्रत्येक रेखावृत्तास एक निश्चित ठिकाण ओलांडण्यास 4 मिनिटे लागतात.
* भारतीय प्रमाणवेळ 82.5 पूर्व रेखावृत्तावरून निश्चित केली आहे . तिला 1905 पासून मान्यता दिली गेली.
* भारतीय प्रमाणवेळ रेषा ही अलाहाबाद व वाराणसी मध्ये असणाऱ्या मिर्झापूर (उत्तरप्रदेश) या शहरातून जाते.
* ज्या देशाची पूर्व पश्चिम लांबी जास्त आहे त्या देशात एकापेक्षा जास्त प्रमाणवेळा असतात.
* भारतीय प्रमाणवेळ ग्रीनीचच्या वेळेच्या 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. त्यामुळे इंग्लंड मध्ये 9 वाजले असता भारतात दुपारचे 2:30 वाजलेले असतात.
* भारताचा पूर्व-पश्चिम विस्तार जास्त आहे. अरुणाचल प्रदेश अतिपूर्व भाग व गुजरातचा अतिपश्चिम भाग यात सुमारे 29 रेखांशाचा फरक आहे. म्हणजेच त्यांच्या स्थानिक वेळेत 1 तास 56 मिनिटांचा फरक पडतो. म्हणून गुजरात मध्ये पहाट असताना अरुणाचल मध्ये दिवस उजाडलेला असतो.
👌👌⭐⭐⭐⭐⭐
उत्तर द्याहटवा👍
हटवासुंदर
उत्तर द्याहटवा